शनिवार, १७ जानेवारी, २००९

डिंक

२००९ मधे (उगाचच) "फिटनेस क्युरियस" वगैरे झाल्यानं मी पुरता "कैलोरी कोंशस" झालोय
आपल्या मराठीत सांगायचं तर "उगाच माजलो आहे..."
म्हणजे काय, तर कोणी काही चांगलं खायला दिलं तरी "खुप छान झालंय.. तुम्ही म्हंजे सुग्रनच...
पण माझं पोट भरलंय... हेहेहे... " करून कैलोरी कशा वाचवायच्या याकडे लक्ष जावू लागलंय..."

त्या जपानी लोकांच्या "हिकुई कारोरी-शोकू" बघू लागलो... "लो कैलोरी जेवण"...
उकळलेल्या पाण्यात भाज्या, मशरूम कापून टाकायच्या..
त्यात मीठ आणि पोजिरु टाकून "ओईषीई" म्हणून खायचं..
तोंडाचं पार भजं झालं होतं..
लय वैतागलो होतो...

आज दुपारी जेवता जेवता डी डी एल जे बघत होतो...
त्यात अमरीश पुरी, आपली बायको फरीदा जलाल हिला पंजाबहून आलेलं आपल्या मित्राचं पत्र दाखवत,
त्याला कसा "पंजाबी मिटटी का वास है" वगैरे सांगत असतो...
आणि अचानक मला कालच बज्ज काकाने आमच्या घरून आणलेल्या माझ्या पार्सेलची आठवण झाली.

अजुन पार्सल नीट फोडलंच नव्हतं...
सगळ्यात वरचा बॉक्स काढला. काय असेल? बघून काही कळत नव्हतं, समजेल असा काही वासही नाही..

"डिन्काचे लाडु?"
नेहेमीप्रमाणे आईनं "अरे, थोडंच देते..." म्हणून केवढं पार्सल दिलं होतं. बज्ज काका चे परत एकदा (मनोमन) आभार मानले.
तेवढ्यात बाजूला एक गोळयांचं पाकिट दिसलं...
"बी कॉम्लेक्स च्या १० गोळयांचं" पाकीट होतं...

"डिन्काचे लाडु फार उष्ण असतात, हाय कॅलरीज! तस्मात... फार तर ५-६ लाडु पाठव..." असा काहीतरी हुशारीचा सल्ला मी आईला दिला होता..

आई शप्पथ! पण आमचे डॅड ग्रेट आहेत!
जास्ती लाडु आणि उष्णतेवरच्या गोळ्या. "खा लेकाच्या... "
याला म्हणतात, एका गोळीत दोन पक्षी...

मी लाडवाचा एक घास घेतला,... आणि सगळा माज उतरला...

त्यात घातलेले खजूर, काजू, बदाम, खोबरं, गुळ (आमचा कोल्हापुरी!),
जायफळ, इलायची आणि डिंक... सारं समोर ताटात घेऊन बसलेली आई, आणि शेजारी मी... एकदम असंच दिसलं... 

पटकन जेवण आटोपून लगेच आईला फोन!
"लाडु लय भारी झालेत..."

४१९३ मैल, ६७८४किलोमीटर, ३६४३ नोटीकल मैल अंतरावरून येणार्‍या लाडवांचा एक घास खाऊन एक गोष्ट लक्षात आली, की हीट, कॅलरीज वगैरे सगळं या प्रेमापूढे शून्य आहे...
त्यातल्या कॅलरीज मोजायच्या नसतात, नव्हे मोजताच येत नाहित...


७ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

४१९३ मैल, ६७८४किलोमीटर, ३६४३ नोटीकल मैल अंतरावरून येणार्‍या लाडवांचा एक घास खाऊन
ही एक गोष्ट लक्षात आली, की हीट, कॅलरीज वगैरे सगळं या प्रेमापूढे शून्य आहे...
त्यातल्या कॅलरीज मोजायाच्या नसतात, नव्हे मोजताच येत नाहित.

最高!! :) :) :)

Rainbow Traveller म्हणाले...

mhantat na mansachya manacha marga tyacha potatoon jato....yatoonach tar prem fulata....nati japata yetat....ani manasa mansanna ghatta chikatoon rahtat....ekdam dinkasarkhi.......ka jibhewar rengalnarya aaichya hatchya dikachya ladvachya chavisarkhi.......anuttaritach ...nahi ka...? he tar fakta hewa waatawa asach.......!

HAREKRISHNAJI म्हणाले...

आपल्या आईच्या हातच्या डिंकांच्या लाडवांची चव येथपर्यंत पोचली.

मजा आहे एका मुलाची

ऋयाम म्हणाले...

कमेंट बद्दल सर्वांना धन्यवाद!

ट्रॅवेलर मित्रा.. तोडलंस बघ...

"डिंकाच्या लाडवामुळे माणसं डिंकासारखी घट्ट चिकटून रहातात" :-)

Maithili म्हणाले...

too good. gele kahi divs mi suddha he fitness che khul ghetalay tyamule aaichya hatache tilache laduhi khalle nahit pan aata nakki khain ajun kahi varshani konas thauk ase taje taje garam garam ladu khayala milatil ki nahi? gharapasun door rahane nashibat aale tar ha kelela maaj aathvel aani pashchatap hoil...

nachiket म्हणाले...

laiiiiiiiiiiiiii bhari mitra!!!!!!!!

Yawning Dog म्हणाले...

मलापण डिंकाचे लाडू द्या हो.

अरे, पहिल्यांदाच पाहिला तुझा ब्लॉग आज...१ नंबर आहे, रिडरमधे टाकला आहे लगेच :)