शनिवार, २१ जुलै, २००७

प्रिय मित्र वीकएंड यास...

प्रिय मित्र वीकएंड यास,

सप्रेम नमस्कार विनंती विशेष।

"फ्रायडे नाईट-फ्रायडे नाईट!!" :- ज्याची वाट पाहत आम्ही एक-एक दिवस अक्षरशः ढकलतो,
तो तूच तर आहेस. आठवतंय? फाइव्ह-डे-वीक आल्यापासून तुझ्याशी ओळख झाली आणि हळूहळू मैत्रीच झाली. खरं सांगायचं तर, तोपर्यंत तू मंगळवार, बुधवार किंवा गुरुवार सारखाच होतास :- ठीकठाक!
बाकी, सोमवारचा आमच्यावरचा राग कायम आहे. दोन दिवस चांगली सुट्टी घेतल्यावर अजून काय करणार आम्ही तरी? नाही करावंसं वाटत काम. :-( नाही आवडत सोमवार... बाकी तू कसा आहेस? तुझं आणि शानिवारचं भांडण मिटलं नसेल अजून? तू भारी का मी भारी ? :-)

पत्र लिहायचं कारण जरा विशेष आहे. आजचा ई सकाळ वाचलास का?
तो बघ. लगेच... नारायण मूर्ती म्हणतायत, "रूपया वधारतो आहे...चांगलं आहे... प्रगती होते आहे. पण... " "पण!".. या "पण" शिवाय मोठ्या माणसांची वाक्यं पूर्णच होत नाहीत वाटतं..

"ते म्हणाले तर तुझं काय गेलं??"
"च्यायला, विसरलास? तूझं आणि शनिवारचं भांडण??"
शनिवारी सुट्टी मिळायला लागल्यावर त्यानं केलेला माज? :-D

ते जाउदे. महत्त्वाचं हे आहे की, आमची सुट्टी जाणार ..
आमची हक्काची सुट्टी... पाच दिवस काम केला की २ दिवस हवीच सुट्टी!

बाकी फील्ड्समध्ये नसते?
हेच तर वेगळं आहे आय-टीचं...
अरे, वेगळं काम असतं, तुला कसा सांगू? ते वाच आधी. मग सांगतो.

कळलं? तासावर पैसे मिळतात, आणी ते डॉलर टू रूपी असे कन्वर्ट केले
की जे पैसे मिळतात, त्यावर पगार होतात. आता हा रुपयांचा रेट वाढल्यामुळे
मिलणारे डॉलर तेवढेच, पण रुपये कमी असं झालं आहे.

मग काय? जास्ती तास कामं करून घेण्याशिवाय कंपनीकडेपण पर्याय नाहीये.
पगार तर कमी नाही करू शकणार. मग उरलं हेच. बॅक-टू-दी-पास्ट? "सिक्स-डे-वीक???"

कसं होईल आमचं ??

गरज नसते? म्हणणं सोपं आहे. अरे, बरीच कामं असतात।

बर सांगतो.
प्रोजेक्ट्ची किक-ऑफ़ नावाचा एक प्रकार असतो. तो झाला रे झाला, की समजायचं..
लाथ बसलेली आहे. आता खैर नाही. आहेत नाहीत तेवढी सगळी घोड़ी जमा करून, कुठल्या घाण्याला कुठलं गाढव बांधायचं, ते इथं ठरतं.. घोडा = गाढव, गाढव = घोडा .. काहीही म्हणा.

"सॅटरडे पकडला आहे शेड्यूल मधे... " इती पी.एम..
सन्डे सुट्टी घ्या की.. (उपकार करत म्हटलं जातं..)
मग, बरेचदा नाईट-आउट्स होतात। टीम सदैव एकत्र। मैत्री होते, पण बरीच कारणं, ज्यामूळे भांडणं पण असतातंच.. सुट्टी पाहिजे वाटायला लागतं.. काम संपलं नाही तर घरी नाही जावू शकत... दुसरं कोणी हे काम का करत नाही? त्याला त्याचा काम असतंच की..


तेच सांगतोय, नाही मिळत नेहेमी सुट्टी. वर लिहिलं होतं ते "आयडीअली" होतं. (किमान
आय-टी मधे तरी आयडीअलीचा अर्थ अशक्य असाच होतो.) सुट्टी नावाला असते.. पण कधी कधी तरी जी मिळते, तीही गेली तर काय? असा प्रश्न आहे...

जास्त तास काम सध्याही चालू आहे।
मोठ्या कंपन्यांचं माहीत नाही. छोट्या कंपन्यांचं तरी असं आहे...

टू बी कन्टीन्यूड...