वाढदिवस म्हटलं की मक्खातल्या मक्ख माणसाच्या तोंडावरची माशीदेखिल उड़ते म्हणतात.. २५ सप्टेम्बर २००८ हा दिवस भलताच आनंदी करून गेला... या दिवशी ( जो एक वर्किंग डे होता!!) ४ येकदम इनटरेष्टिंग लोक आणि मी असा एकंदर ५ जणान्चा वाढदिवस साजरा केला गेला !!!
सकाळी सहाला उठलो... स्नान केलं.... ख़ास वाढदिवसासाठी (नसून २-३ महिन्यांपूर्वी स्वस्तात मस्त वाटुन) घेतलेला शर्ट घालुया!" एकदम "जेम्स बौंड" टैपचा मस्त "व्हाइट-शर्ट" होता! इस्त्री करताना बघितलं, तर शर्टवर लिहिलं होतं, "मेड इन विएतनाम!!" "साला... विएतनामचा बौंड!!"
लहानपणापासूनची सवय : - नवीन कपडे घालून देवाला नमस्कार केला... साडेसात वाजत होते, तेवढ्यात फ़ोन वाजला.... "कॉलर आयडीच्या" जागी "ID WithHeld !?" बरोबर... आईबाबा! त्यांनी सकाळी ४ ला उठून फोन केला होता! चला! दिवसाची सुरुवात एकदम चांगली झालिये, आता दिवसही चांगला जाणार !!!
"तू आता २०-२५ गटात राहिला नाहीस... २६-३० मधे आला आहेस... आता बघता बघता ३० कसा पार होइल कळणार नाही..." काल रात्रि श्री. बाता यांनी दिलेलं शिक्षण आठवलं... काय पण दिवस निवडलाय बाताने...
४.३० ला पेंग्विन काकांचा मेस्सेज : ' आज तुझा बड्डे आहे... अजुन देशपांडे काका-काकुंचाआणि मिस शेंडीचाही(सगळे गोल्डन-वीक ट्रिप फेम )आहे.. आम्ही विचार करत होतो, सगळे भेटायचं का?
मी लग्गेच :- "हो!"
एकदम देशपांडे काकुंचा फोन : - तू हे कर, मी ते करून आणते.. चालेल ना??
"डन!! "

घरी येउन ऑरकुट बघितलं, तर मित्रांनी विष केलं होतं :-
"विष यु अ हैप्पी बर्थडे !"
"मयुर, यु रॉक(?!)"
"वी मिस(?!) यु.."
"हर कुत्ते का एक दिन आता है, ले, तेरा भी आया गया ना?"
संध्याकाळी पेंग्विन काका घरी आले आणि पहिला डायलोग : - "अरे, हे काय? हे काय झालंय? तुला सांगतो.... तू जिम लाव... हे किती जाड झालायस!? अजुन तुझं लग्न पण व्हायचंय!!"
पेंग्विन काका नेहेमीच लग्न आणि जिमचं मार्केटिंग करतो, पण आज वाटच लावून गेला एकदम!
केक कापताना ५ नाही ,६ वेळा "हैप्पी बड्डे टू यु ♪" म्हणण्यात आलं... मिश्टर सिड ( गोल्डन-वीक ट्रिप फेम ) यांच्यासाठी ही एकदा.. एका "वीकडे"ला "अचानक" भेटून वडापाव, दहीभात असा मेन्यु, लै भारी झाला.. देशपांडे काका काकूनकडून थरमास प्रेज़ेन्ट मिळाला.. मग काय, खुशच!

जेवण वगैरे झाल्यावर "मग? तुझं या वर्षीचे रेजोल्युशन काय?" असा प्रश्न आला...
:- काय सांगावं?? विचारंच नव्हता केला.. २५ वा वाढदिवस.. "रौप्य-महोत्सव" का काय म्हणतात ना?
तर अशा या दिवशी "आपण आता लहान नाही राहिलो आहोत", "(थोड़े जास्तीच) जाड झालो आहोत" वगैरे वगैरे मित्रानी सगळं खरंखरं सांगुन पोपट केला होता...
असुदे.. आपण "लै भारी" नाही, हे चांगलंच आहे..
वय वाढलं की काही लोकं उगाच फार मोठं झाल्यासारखं वागतात...
तुम्ही सांगा, तुम्हाला तुम्ही आहात तेवढ्या वयाचे झाला असं वाटतं का? जाउदे..
आपला अजुन टाइम पास चालूच आहे... मागच्या वर्षी फ्लैटचं टायमिंग चुकवून आपण केलेला पराक्रम आठवला, आणि मलाच हसू आलं... बाकी मी केलेला हा एकमेव आर्थिक घोटाळा असेल...
आता हा २५वा वाढदिवस..
थोरामोठ्यानी सांगितलं आहे:- "गद्धे-पञ्चविशी" बद्दल!
त्यामुळे या वर्षी हवा तितका "गद्धेपणा" करता येइल..
हे सगळं लगेच सांगुन "गद्धेपणा" करायला नको, म्हणुन मी म्हटलं, रेजोल्युशन असं आहे की :- "येत्या आर्थिक वर्षात वजन क्षक्ष च्या पुढे जाऊ न देणे..."
शेवटी काय, आपल्या वाढदिवसादिवशी आपल्या आवडीच्या लोकांकडून "आठवणीने फ़ोन-मेसेज येणे", त्यातल्या काही लोकांबरोबर "स्नेह-भोजन" होणे वगैरे झालं की बस.. या सगळ्यात "वय वाढवायची" काय गरज आहे, नाही का??