मंगळवार, २२ जून, २०१०

चुकुन आलेलं ईमेल : लॉन्ग टाइम नो सी... :)

काल मला एक ईमेल आलं. कोणा अनोळखी माणसाकडुन होतं. "काय माहित?" म्हणुन दुर्लक्ष केलं काल, पण आज त्यावर हे उत्तरही आलेलं दिसलं म्हणुन इथं पेस्टतोय....

ईमेल १ :

---------------------------------------------------------------------------------------------

Subject : नमस्कार. लाँटानोसी. :)
Text :

काय रे नार्‍या? कसा आहेस? :)
लाँगटाईमनोसी रे... :(
कसा चाल्लाय जॉब? कसं आहे शेड्युल?
आणि तुझ्या 'ट्रॅव्हल कंपनी सुरु करायचं' कुठपर्यंत आलं?
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या जमान्यात तुझा 'फिरण्याचा छंद, पार बंद' झालं असेल नाही!?

मी खरंच वैतागलोय रे. :(
जॉईन झाल्यापासुन तेच एक मोनोटोनस काम. "अकाउंट्स"चं.
पगारवाढ नाही. डल काम सालं.

तुला म्हटलेलं आठवतंय का? "हा तर माझा टेंपररी जॉब आहे. माझा खरा इंटरेस्ट फायनान्समधे आहे..."
तुझी "कुबेर कन्सल्टन्सीच्या" वरच्या लोकांशी ओळख आहे ना, जरा बोलुन बघ की.. प्लीज.
पीएफे, अपडेटेड रेझ्युमे.

* अजुन एक सांगतो, कोणाला सांगु नकोस. परवा मी चुकुन एक घोळ केला. चुकुन काय, मुद्दामच! ;)
फ्रस्ट्रेट झालो आणि डायरेक्ट एक अपडेट क्वेरी मारली. "XXX टेबलवर!" आता बस म्हणाव बॉसला!:)

चल, कळव मग...
सीया.

-CG.
*** कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ***
* I Don't Kill Trees! Yeah, Go Green!!! *

P.S. बॉसचा रेडा इतका वास मारतो ना, काय सांगु. :)
बॉस काय कमी रेडा आहे? एलोएल! आणि बॉसही काय कमी वास मारतो? :D

---------------------------------------------------------------------------------------------

ईमेल २ :
---------------------------------------------------------------------------------------------

From: naradmuni@gmail.com
To: naradamuni@gmail.com
Cc: chitragupt@gmail.com

Subject : Re : नमस्कार. लाँटानोसी. :)
Text : प्रिय नारदमुनी(naradamuni@gmail.com),
तुम्हाला चुकुन मिळालेली ही ईमेल, मला(naradmuni@gmail.com), केवळ विनोद म्हणुन पाठवण्यात
आली होती. तरी ती सिरीअसली न घेता डीलीट करुन टाकावी ही नम्र विनंती.

आपला नम्र,
नारदमुनी.

~~~~~नारद. ~~~~~
~ युंही चला चल राही ~
~ ह्या प्रिंटची तुम्हाला खरंच गरज आहे का? Green IT! ~

PS:
१. तुमचा आयडी आमच्या विशेष यादीमधे नोंदवला आहे याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे.
२. आणि हो. "पापपुण्य डिटेल्स" टेबलवर कोणतीही अपडेट क्वेरी मारण्यात आलेली नाहीये. तो विनोद होता. तुमची पापं डीलीट केली गेलेली नाहीत.
३. २ मधे सांगितलं आहेच, परत सांगतो. तो विनोद होता. लगेच हे कोणाला फॉर्वर्ड करण्याआधी, १ वाचा. परिणाम वाईट होतील हे सांगायलाच हवं का?

---------------------------------------------------------------------------------------------

wid a पिंच ऑफ सॉल्ट. :)