कालच एका ट्रेनिंगबद्दलची मेल आली. (~चं मेल आलं?)
त्यात टिपिकल जपानी पद्धतीप्रमाणे, आधी "काय काय करायचं नाही" याबद्दल मोठी यादी होती..
म्हंजे अगदी लाल फॉण्ट मधे... बोल्ड आणि अन्डर्लाइन करून... (ब्लॉगर मधे अन्डर्लाइन नाही आहेरे!
नवा शोध!)
मग आलं:- आपण हे शिकाल...
आणि नंतर काय तर होतं:- "पुरे तोरे"
मला बर्यापैकी जपानी कळतं... माझं जावूद्या..
त्या डिक्शनरीलाही वाचता येवू नये? अर्थ कळु नये?
जरा नीट विचार केला,
आणि नंतर समजलं:-
"प्री ट्रेनिंग" ला जपानी मधे "पुरेतोरे" म्हणतात..
पुरे तोरे हा "पुरे- तोरे-निंगु" चा शोर्ट फॉर्म!
अशी ही जपानची "काताकाना" भाषा!
जपानी सोडून बाकी भाषेतले शब्द बोलण्यासाठी तयार केली गेली.
आता प्रश्न असा येतो, की हा "काताकाना" शब्द म्हंजे जपानी नाही, हे समजलं..... पण म्हणुन ते इंग्लिश असेलच असं नाही..
"आरू बाइतो" घ्या.
"पॉकेट-मनी" साठीचा हा शब्द. मुळचा "जर्मन!" :- "arbeit"
आता हे आम्हाला कुठून कळणार ???
जाउदे...
चला.. "पुरे" झालं.. निघाला राग...
शनिवार, २१ फेब्रुवारी, २००९
शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २००९
सुखद-सुन्दर
नमस्कार मित्रा.
आज "लिटील चैम्प्स"चा शेवटचा एपिसोड पाहिला आणि लक्षात आले, "आता हे सम्पणार.."म्हणुन हा "ब्लोग-प्रपन्च". एक छोटासा आढावा...
मी परदेशात रहातोय... तरीही हे सारे एपिसोड्स नेहेमी, वेळच्या वेळी बघु शकायचो, याचे श्रेय तुलाच मित्रा..इथे तुझे नाव तर लिहिता येणार नाहि, पण कदाचित तु हे वाचशील अशी आशा....
सान्गायचा मुद्दा असा की माझ्यासारखे असे किती जण असतील, आहेत- जे महाराष्ट्राबाहेर,देशाबाहेर रहातात, आणि "प्रत्येक" शनिवार सकाळ (मी शुक्रवार रात्रीच!), "सा रे ग म प" बघण्यासाठी मोकळी ठेवतात?! शनिवार, रवीवारी मित्रान्न भेटलो कि चर्चा हीच-" प्रथमेश काय गायला..." "आर्या भारी आहे", "मुग्धा"... "रोहीत"... "कार्तिकी"...
"शाल्मली जायला नको होती...." ... एक ना अनेक... सगळे बोलणे चान्गलेच होते, असेही काही नाही... . वाद होतेच :-)
तर कार्यक्रमाबद्दल बोलायचे तर सुरुवात करावी लागेल "चाबुक" गुप्ते यान्च्यापासुन... या सर्व एपिसोड्स मधे त्याने इतकी मजा आणली, की काही विचारु नका! मधुन मधुन उगाचच त्यान्च पल्लवी आणि सामन्त बाइन्ना छेडणे बघुन गम्मत वाटायची.. वेगवेगळे किस्से, उपमा ऐकताना छान मजा यायची. त्याने गायलेले "आयुष्य हे" गाणे तर जबर्दस्तच. "तोडलस अवधूत मित्रा!" "कडक... क-ड-क!"
पल्लवी "क्या बात है" जोशी! "तिच्या सुत्रसन्चालनात तोच-तोचपणा आहे...", कधी कधी "मराठी असुनही हिला स्वतहाचे मराठी सुधारता येत नाही का, हे पाचवे शेड्युल आहे" वगैरे कमेन्ट्स वाचले, पण शेवटी एवढ्याशा गोष्टीमुळे तिचे क्रेडीट काढुन तर नाही घेता येणार..." प्रसन्न चेहेर्याने नेहेमी सर्वान्चे स्वागत करणारी, पर्फ़ोर्मन्स डाउन झाला एखाद्याचा तर चिअर अप करणारी ती पल्लवीच होती! थोडे मन मोठे करुया!?!
वैशाली सामन्त अशा वेळी दिसुन यायची, जेव्हा अवधुत दादा जरा जास्तीच लहान व्हायचा किन्वा "पर्फ़ोर्मन्स" बद्दल अति करायचा. तेव्हा मुलान्शी नीट, चान्गल्या शब्दात बोलुन उणीवा, चुका सागणारी वैशाली सामन्त होती.
म्युझीशीयन्स चे जितके कौतुक करावे तितके कमीच. अलिकडल्या एपिसोड्स मधले "चम चम" अप्रतीम होते! सगळॆच एकमेकान्च्या तोडीस तोड!
यात अजुन मजा आणली ती काही मान्यवरान्नी. शन्कर महादेवनचा एपिसोड कोणी विसरु शकणार नाही. आशा खाडिलकर बाइन्चे मार्गदर्शन छान होते.. सन्जीव अभ्यन्कर! देवकी पन्डीत! मुलान्मधे आलोय म्हणुन उगाच मोठेपणा दाखवला नाही विशेष कोणी!
पण यात सर्वात शिखरावर होते, पन्डीत ह्रुदयनाथ मन्गेशकर! त्यान्ची "शिवकल्याण राजा" मधली गाणी ऐकुन, स्वातन्त्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवन्त फ़डके यान्च्या गोष्टी ऐकुन मनातला सह्याद्री पेटुन उठला. एकुणच मराठी माणसाच्या "आयडेन्टीटी", "स्वाभिमाना"मधे एक मोठी भर टाकणारा असा हा कार्यक्रम ठरला. काळाच्या ओघात हरवलेली, सध्या जुनी झालेली किती तरी गाणी या निमित्ताने परत आपल्यासमोर आली.अवधुतने व्यक्त केलेली, "या सर्वान्ना घेवुन सन्गीत नाटक बसवा" ही इच्छा जेव्हा/जर प्रत्यक्षात येईल, तो दिवस सोन्याचा!
काही सन्माननिय अपवाद वगळता, हिन्दी मधे गाण्याच्या नावाखाली जो काही प्रकार चालु असतो, तो पाहुन परत काही ते पहायची इच्छा नसताना हा कार्यक्रम आला आणि वेड लावुन गेला.... हिन्दी मधली "नौटन्की"पाहता यात कधी कधी झालेली तथाकथित पार्शालिटी सोडुन देवु शकु आपण कदाचीत.
शेवटी आभार झी मराठीचे, महाराष्ट्राच्या महान सन्गीत परम्परेची झलक दाखवुन देणारा,कामातली सारी टेन्शन्स, कन्टाळा, कधी निराशा दुर करणारा, इतका सुखद-सुन्दर कार्यक्रम बनवल्याबद्दल! लिटील चैम्प्सना गाण्याच्या व्यतीरिक्त इतरही मार्गदर्शन दिल्याबद्दल!
मोठे होवुन यान्च्याकडुन सम्पुर्ण महाराष्ट्रावर सुन्दर गाण्यान्चा अखन्ड वर्षाव होत राहो,ही प्रार्थना! आणि मोठे व्हायला वेळ आहे, तोपर्यन्त देखील!
मित्रा, परत एकदा धन्यवाद, "नेहेमी", "सा रे ग म प लिटील चैम्प्स" चे एपिसोड्स पोस्ट केल्याबद्द्दल.. शुभेच्छा! जय महाराष्ट्र!

या फ़ोटोचे मालक http://www.zeemarathi.com/SRGMPLittleChamps2008

बुधवार, २१ जानेवारी, २००९
काय काय आणि?
एक फुकट प्रश्न..
बोलायला काही नसलं की उगाच विचारायचं...
"काय काय आणि ?"
तर आज बोलायला काही नाहिये, पण दिवसभर (मधून मधून काम करता करता) एक ब्लॉग वाचला त्याबद्दल बोलायलाच पायजे.... अतिशय घाण (जपानीत कागदपत्रे तयार करण्याचं )काम करत असता भारी टी पी करून दिलेल्यांचे आभार मानलेच पायजेत...
कसला नाद-खुळा ब्लॉग! एक नाही दोन!
विषय "कन्टाळा" आणि "बाश्कळ बडबड"...
कसला क्रिएटिव ब्लॉग असावा एखाद्याचा !??
फुल फुल "ओ सुसुमे!" बोलेतो :- "I Recommend!"
"बाश्कळ बडबड": - www.bashkalbadbad.blogspot.com
"कन्टाळा": - www.kantala.blogspot.com
( हे लिहिताना त्या लेखांची परवानगी नाही घेतलेली, कन्टाळा आला ... )
हा ब्लॉग वाचून परत एकदा वाटलं, "आय टी पीपल" एकदम "दगड"!
i mean, IT people just Rock!

शनिवार, १७ जानेवारी, २००९
डिंक
२००९ मधे (उगाचच) "फिटनेस क्युरियस" वगैरे झाल्यानं मी पुरता "कैलोरी कोंशस" झालोय
आपल्या मराठीत सांगायचं तर "उगाच माजलो आहे..."
म्हणजे काय, तर कोणी काही चांगलं खायला दिलं तरी "खुप छान झालंय.. तुम्ही म्हंजे सुग्रनच...
पण माझं पोट भरलंय... हेहेहे... " करून कैलोरी कशा वाचवायच्या याकडे लक्ष जावू लागलंय..."
त्या जपानी लोकांच्या "हिकुई कारोरी-शोकू" बघू लागलो... "लो कैलोरी जेवण"...
उकळलेल्या पाण्यात भाज्या, मशरूम कापून टाकायच्या..
त्यात मीठ आणि पोजिरु टाकून "ओईषीई" म्हणून खायचं..
तोंडाचं पार भजं झालं होतं..
लय वैतागलो होतो...
आज दुपारी जेवता जेवता डी डी एल जे बघत होतो...
त्यात अमरीश पुरी, आपली बायको फरीदा जलाल हिला पंजाबहून आलेलं आपल्या मित्राचं पत्र दाखवत,
त्याला कसा "पंजाबी मिटटी का वास है" वगैरे सांगत असतो...
आणि अचानक मला कालच बज्ज काकाने आमच्या घरून आणलेल्या माझ्या पार्सेलची आठवण झाली.
अजुन पार्सल नीट फोडलंच नव्हतं...
सगळ्यात वरचा बॉक्स काढला. काय असेल? बघून काही कळत नव्हतं, समजेल असा काही वासही नाही..
"डिन्काचे लाडु?"
नेहेमीप्रमाणे आईनं "अरे, थोडंच देते..." म्हणून केवढं पार्सल दिलं होतं. बज्ज काका चे परत एकदा (मनोमन) आभार मानले.
तेवढ्यात बाजूला एक गोळयांचं पाकिट दिसलं...
"बी कॉम्लेक्स च्या १० गोळयांचं" पाकीट होतं...
"डिन्काचे लाडु फार उष्ण असतात, हाय कॅलरीज! तस्मात... फार तर ५-६ लाडु पाठव..." असा काहीतरी हुशारीचा सल्ला मी आईला दिला होता..
आई शप्पथ! पण आमचे डॅड ग्रेट आहेत!
जास्ती लाडु आणि उष्णतेवरच्या गोळ्या. "खा लेकाच्या... "
याला म्हणतात, एका गोळीत दोन पक्षी...
मी लाडवाचा एक घास घेतला,... आणि सगळा माज उतरला...
त्यात घातलेले खजूर, काजू, बदाम, खोबरं, गुळ (आमचा कोल्हापुरी!),
जायफळ, इलायची आणि डिंक... सारं समोर ताटात घेऊन बसलेली आई, आणि शेजारी मी... एकदम असंच दिसलं...
पटकन जेवण आटोपून लगेच आईला फोन!
"लाडु लय भारी झालेत..."
४१९३ मैल, ६७८४किलोमीटर, ३६४३ नोटीकल मैल अंतरावरून येणार्या लाडवांचा एक घास खाऊन एक गोष्ट लक्षात आली, की हीट, कॅलरीज वगैरे सगळं या प्रेमापूढे शून्य आहे...
त्यातल्या कॅलरीज मोजायच्या नसतात, नव्हे मोजताच येत नाहित...

बुधवार, ७ जानेवारी, २००९
"थोडं कडू; पण खूप गोड..."
एक जानेवारी २००९ ला प्रस्तुत लेख छापून दिल्याबद्दल "सकाळ पेपर्स, पुणे" यांचे मनःपूर्वक आभार! लय-लय धन्यवाद! सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :-)
(मुळ लिंक:- http://www.esakal.com/esakal/01072009/My_Pune3380B4EAC9.htm)
मी शाळेत असताना पुण्यात यायचो ते सुटीसाठी. नंतर शिक्षणासाठी येऊन राहिलो. पुढे नोकरीनिमित्त जपानला गेलो. त्या काळच्या पुण्याच्या खूप साऱ्या मस्त आठवणी आहेत. आज पुण्यात दिसणारा बदल सुखावतो; पण त्याचबरोबर थोडा खिन्नही करतो. आता मला पुणं वाटतं ते थोडं कडू; पण खूप सारं गोड...
कधी दिवाळीच्या, कधी मे महिन्याच्या सुट्टीत येणं व्हायचं मावशीकडे. कमला नेहरू पार्कसमोर. मावशीकडच्या भावंडांत मी सगळ्यात लहान. त्यामुळे नेहमी लाड! तिथंच मग लांब "नगर रोड'ला राहणारी दुसऱ्या मावशीकडची मंडळी यायची. मग काय? घरात चिवडा-लाडू, बाहेर जाऊन केक, कधी पेस्ट्री- पिझ्झा! नुसती मज्जा!! बाहेर गेलं की आई-वडीलही जरा चांगलं वागतात; म्हणजे विशेष ओरडत नाहीत, त्यामुळे आणखीनच मज्जा!
काका बॅडमिंटनचे कोच असल्याने सकाळी पी.वाय.सी. वर! बाहेर "गुपचूप' संतोष बेकरीचं पॅटीस खाऊन, जरा भटकून परत घरी उपमा खायला तयार! कधी कधी सकाळी वेळ मिळाला की दादा टेकडीवर घेऊन जात असे. पण तिथंही त्याला मैत्रिणी भेटायच्याच... चेकडी चढता-उतरता हाय-बाय व्हायचं... संध्याकाळी ताई (प्रत्यक्षात ताई, दादा कधीच म्हटलो नाही!) आली, की तिच्याबरोबर प्रभात रोडवर फिरायला...
मारुती एस्टिम, फियाट, उनो, कॉन्टेसा, मर्सिडीज या गाड्या तिच्याबरोबर फिरताना पहिल्यांदा बघितल्या. तेव्हाच्या माझ्या निरीक्षणाप्रमाणे, पुणं हे "सायकलीं'चं नसून कायनेटिक होंडाचं शहर होतं.
के.एन.पी. (कमला नेहरू पार्कला आजकाल म्हणतात म्हणे!)च्या शेजारच्या महाराष्ट्र बॅंकेच्या कट्ट्यावर, रात्री मित्र-मैत्रिणींची टोळकी बसलेली दिसत. काही जणांकडे "कायनेटिक होंडा'. माझ्याकडे तेव्हा सायकलसुद्धा नव्हती.
खूप राग यायचा, "कधी मोठे होणार? कधी कायनेटिक घेणार? कधी पुण्यात राहायला मिळणार?'
पाचवी-सहावीत होतो तेव्हा "शून्य अभ्यास, पूर्ण मजा' या द्विसूत्री कार्यक्रमामुळे "ओरिजिनली', मला पुणे तिथे काय उणे असं वाटायचं... नंतर ते अजून कोणालातरी सुचलं आणि फेमस झालं.
नंतर आलो ते कोल्हापूरहून एनसीसी कॅम्पसाठी. एकेक आठवड्याचा एटीसी कॅम्प. एकदा औंध, एकदा खडकी, असं दोन वर्ष आलो. शिक्षणाच्याच निमित्ताने त्याच खडकीला येऊ, असं तेव्हा वाटलं नव्हतं. भरपूर झाडं, मोकळी जागा, थंड वातावरण, बॉम्बे सॅपर्सचा एरिया... वगैरेमुळे खडकी छान वाटायचं.
तेव्हाचा अजूनएक बऱ्याचदा ऐकलेला पॅटर्न म्हणजे, "मुलगा कोल्हापूरमध्ये इंजिनिअरिंग करतो... पुण्यात नोकरी करू लागतो... आणि लव्ह मॅरेज करतो...'' खरंच बऱ्याचदा ऐकलेलं! आपला काही संबंध नाही, उगाच आठवलं म्हणून...
मी आणि मित्र पेईंग गेस्ट म्हणून राहायचो त्या काकूंकडे कधी कधी नाश्ता नसेल, तेव्हा मग बाहेर जाऊन "कच्छी दाबेली' खाऊन यायचो. बिबवेवाडीत तेव्हा गंगाधाम वगैरे अजून सुरू व्हायचं होतं. तिथं नुकतंच एक भेळेचं दुकान सुरू झालेलं. "विशेष चांगलं नसताना उगाच गर्दी होते... पुण्यातले लोक काहीही खातात!'' असं उगाचच त्या मित्राचं मत होतं... तेव्हा विद्यार्जन(!) करत असल्यामुळे आमची तेवढीच मजल होती. तिथं नवीन सुरू झालेलं एक हॉटेल होतं... रात्री अभ्यास (कधी कधी करायचो) करताना त्या हॉटेलकडे बघून म्हणायचो ः "नोकरी लागेल त्या रात्री इथे जेवायला येऊन सगळ्यात महाग आयटम खायचा!'' नोकरी लागल्यापासून एकदाही तिकडे जाता आलं नाही हा भाग वेगळा. बाकी "अभ्यास करायचा' पासून इतरही "बऱ्याच' विषयांवर "महाचर्चा' करून दमून बऱ्याचदा अभ्यास लांबच राहायचा. मग काय? परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यासात रात्री जागवल्या जायच्या. दर वर्षी न चुकता देवाला "वाचव रे!' असायचंच. "सारसबाग', "शनिपार', "मोदी गणपती', "ओंकारेश्वर', "दगडू हलवाई' सर्वांनी नेहमीच कृपा केली आहे. अपरिहार्य असणारा निकाल लागला, तर तो पचवायला त्यांनीच शक्ती दिली आहे.
नोकरीसाठी नुसतं "कॉम्प्युटर ग्रॅज्युएशन' पुरणार नाही, इतरही काही असलेलं बरं, या विचारापोटी जपानी भाषेचा अभ्यास करायचं ठरवलं. तेव्हा फर्ग्युसन कॉलेज रोडवर खासगी क्लाससोबतच मदत झाली ती "रानडे इन्स्टिट्यूटची!' एवढं "बिझी शेड्यूल' कधीच नव्हतं. मी आणि मित्र सारखे कुठल्यातरी परीक्षेची तयारी करत असायचो. तेव्हाचे विरंगुळे होते :- "लेक्चरच्या ब्रेकमध्ये रानडे टपरीमधला चहा', "प्रियदर्शिनीचे ब्रेड-पॅटिस', "त्रिमूर्तीमधला सामोसा.' मध्ये मध्ये असायचे "वैशाली!' तिथं एखादी गोष्ट "सेलिब्रेट' करायला जायचो. सहसा तिघं जण असू. तीन कॉफी, एक बटर टोस्ट. कधी वेळ काढून "दुर्गा' कॉफी हौसला जायचो. अजून काही जागा म्हणजे "गुडलक' आणि "लकी'. "लकी' बंद झाल्यावर फार वाईट वाटलं होतं.
"रानडे'मध्येच मी आणि मित्राने काही जपानी मित्र बनवले. एकीने "तेंपुरा', दुसरीने "ओकोनोमी याकी' बनवून खायला घातले. त्यांच्याबरोबर औंधला "सर्जामध्ये!' त्यातल्या एकीने कॅम्पमधल्या "ब्लू नाईल'ची ओळख करून दिली. आज जपानमध्ये त्यांच्याशी भेट झाल्यावरही त्यांनी "सर्जा', "ब्लू-नाईल'ची आठवण काढलीच.
आता दोन वर्षं पुण्यापासून दूर राहतो आहे. मध्ये मध्ये पुण्याला गेल्यावर काही गोष्टी बघून चांगलं वाटलं आणि जरा वाईटही वाटलं... सिंबायोसिसजवळचं "आयसीसी' पुण्यातली कॉलेजेस, बिबवेवाडीचा आमचा रस्ता पॉश झालेला वगैरे बघून गर्वाने छाती फुलते. लोड शेडिंग कमी झाल्याचं ऐकलं की छान वाटतं; पण कार्बनडाय ऑक्साईडच्या कमाल पातळीची पर्वा न करणारे वाहनचालक बघितले, सिग्नल तोडणारे लोक बघितले (यात लिंगभेद अजिबात नाही) की वाईट वाटते. रस्ते का सुधारत नाहीत? पुणं बकाल का होऊ लागलंय?
मुंबईसारखंच पुण्यातही सिग्नलवर कुटुंबच्या कुटुंब भीक मागू लागणं का सुरू झालंय? नुकतंच "आयटी'मुळे पुणं हे दहशतवादाचं केंद्रही बनलेलं ऐकून फार फार वाईट वाटलं. यावर उपाय मलाही सुचू शकतात. मग सरकारला काय झालंय? त्यांना वाटत नाही का, हे आहे "माझं पुणं?'

रविवार, १२ ऑक्टोबर, २००८
गुडलक!!!
सकाळी सकाळी ८.३० ला उठून, मुख मार्जन वगैरे केलं, आणि आमच्या बाता भाईंनी फर्माइश केली:-
"चल, गुड लक मधे जाउया.."
"चल..."
टोकियोत बाकी सगळा एकदम झगमगाट असला तरी काही काही होटेल्स अशी आहेत, की जी जुन्या काळापासुन जशी होती तशीच आहेत.. त्यातल्याच एकाला बाता भाई गुड लक म्हणतो...
तर असे हे गुड लक आमच्या घराशेजारीच आहे.. तिथे येणारे लोकही ठरलेले..
आम्ही दोघे तिथे असताना तिथल्या पाहुणे मण्डाळीन्चे सरासरी वयमान काढले तर साधारण ६०-६२वर्षे येइल!!! काळ बदलला की सगलं बदलतं.. जुन्या काळातल्या लोकांना आपलं, आपल्या वेळचं असं काहीतरी तिथे आहे, असं वाटत असावं कदाचित.. जपान मधे म्हातार्या लोकांचे प्रमाण खुप आहे, म्हणुनच "इतक्या लोकांचे गिर्हाइक कोण सोडेल??" अशा विचारात हे होटेल अजुन रेनोव्हेट वगैरे झालं नाही असं वाटलं.. तिथल्या वेट्रेस पण म्हातार्या!!
या होटेलात कितीही वेळ कोफी पित बसता येतं... कोणीही बिल आपटून जात नाही..
गुड लक सही अजुन एक साधर्म्य :- "धुवाँ-धुवाँ" "धुवाँ-धुवाँ" "धुवाँ-धुवाँ" "धुँवाही धुँवा!"
म्हातार्या लोकांसाठी ख़ास चश्मे ठेवले गेले आहेत... ४-५ वेगवेगळ्या नंबरचे असतील बहुतेक....
दहाबारा वर्तमान पात्रांच्या २-२, ४-४ कॉपीज ठेवल्या गेल्या आहेत...
वयाने बरेच मोठे लोक येवून एकमेकांना एकेरी मधे हाक मारत असतात, ते बघून एकदम भारी वाटतं..
इतकी वर्ष मैत्री निभावालेले मित्र भेटल्यावर एकदम मस्त वाटत असेल नाही?? "वाट्टेल त्या" विषयावर "वाट्टेल त्या पातळीवरून" चालु असलेलं संभाषण मी ऐकलं आहे... :)
-असं काही थोडंसं वेगळं ऐकलं, की जपानी भाषेत म्हणतात:- "मासाका?" (म्हणजे: "हट.. खरंच??")
आज विशेष गर्दी नव्हती..
"आज आपण पण वर्तमान पात्र वाचून पाहुया... "
"अरे, याने चांगला मोठा मासा पकडलाय की... " बाता मुखपृष्ठावरच्या चित्रा कड़े बघून म्हटला..
लाम्बडा मासा हातात धरून, तो एक जपानी माणूस हसंत होता..
"गुड!" - बाता...
दुसरं पान बघितलं, "अजुन एक फोटो..."
"आयला... हे काय नाटक? सध्या काय फिशिंग सीजन आहे का काय?? "
बघितलं तर २० पाने भरून फ़क्त माशांची माहीती!!!
पेपरचं नाव होतं:- "त्सुरी-तोमो" का असं काही तरी... (त्सुरी :- मासे पकडने, आणि तोमो:- मित्र...)
हे बघून आता मात्र आम्हीच म्हटलं, "मासाका, मासाच का??"

हॉटेलचं नाव:- "कोहिकान" (कोही :- कॉफी, कान :- हॉटेल)
शुक्रवार, २६ सप्टेंबर, २००८
हैप्पी बड्डे टू यु ♪
वाढदिवस म्हटलं की मक्खातल्या मक्ख माणसाच्या तोंडावरची माशीदेखिल उड़ते म्हणतात.. २५ सप्टेम्बर २००८ हा दिवस भलताच आनंदी करून गेला... या दिवशी ( जो एक वर्किंग डे होता!!) ४ येकदम इनटरेष्टिंग लोक आणि मी असा एकंदर ५ जणान्चा वाढदिवस साजरा केला गेला !!!
सकाळी सहाला उठलो... स्नान केलं.... ख़ास वाढदिवसासाठी (नसून २-३ महिन्यांपूर्वी स्वस्तात मस्त वाटुन) घेतलेला शर्ट घालुया!" एकदम "जेम्स बौंड" टैपचा मस्त "व्हाइट-शर्ट" होता! इस्त्री करताना बघितलं, तर शर्टवर लिहिलं होतं, "मेड इन विएतनाम!!" "साला... विएतनामचा बौंड!!"
लहानपणापासूनची सवय : - नवीन कपडे घालून देवाला नमस्कार केला... साडेसात वाजत होते, तेवढ्यात फ़ोन वाजला.... "कॉलर आयडीच्या" जागी "ID WithHeld !?" बरोबर... आईबाबा! त्यांनी सकाळी ४ ला उठून फोन केला होता! चला! दिवसाची सुरुवात एकदम चांगली झालिये, आता दिवसही चांगला जाणार !!!
"तू आता २०-२५ गटात राहिला नाहीस... २६-३० मधे आला आहेस... आता बघता बघता ३० कसा पार होइल कळणार नाही..." काल रात्रि श्री. बाता यांनी दिलेलं शिक्षण आठवलं... काय पण दिवस निवडलाय बाताने...
४.३० ला पेंग्विन काकांचा मेस्सेज : ' आज तुझा बड्डे आहे... अजुन देशपांडे काका-काकुंचाआणि मिस शेंडीचाही(सगळे गोल्डन-वीक ट्रिप फेम )आहे.. आम्ही विचार करत होतो, सगळे भेटायचं का?
मी लग्गेच :- "हो!"
एकदम देशपांडे काकुंचा फोन : - तू हे कर, मी ते करून आणते.. चालेल ना??
"डन!! "

घरी येउन ऑरकुट बघितलं, तर मित्रांनी विष केलं होतं :-
"विष यु अ हैप्पी बर्थडे !"
"मयुर, यु रॉक(?!)"
"वी मिस(?!) यु.."
"हर कुत्ते का एक दिन आता है, ले, तेरा भी आया गया ना?"
संध्याकाळी पेंग्विन काका घरी आले आणि पहिला डायलोग : - "अरे, हे काय? हे काय झालंय? तुला सांगतो.... तू जिम लाव... हे किती जाड झालायस!? अजुन तुझं लग्न पण व्हायचंय!!"
पेंग्विन काका नेहेमीच लग्न आणि जिमचं मार्केटिंग करतो, पण आज वाटच लावून गेला एकदम!
केक कापताना ५ नाही ,६ वेळा "हैप्पी बड्डे टू यु ♪" म्हणण्यात आलं... मिश्टर सिड ( गोल्डन-वीक ट्रिप फेम ) यांच्यासाठी ही एकदा.. एका "वीकडे"ला "अचानक" भेटून वडापाव, दहीभात असा मेन्यु, लै भारी झाला.. देशपांडे काका काकूनकडून थरमास प्रेज़ेन्ट मिळाला.. मग काय, खुशच!

जेवण वगैरे झाल्यावर "मग? तुझं या वर्षीचे रेजोल्युशन काय?" असा प्रश्न आला...
:- काय सांगावं?? विचारंच नव्हता केला.. २५ वा वाढदिवस.. "रौप्य-महोत्सव" का काय म्हणतात ना?
तर अशा या दिवशी "आपण आता लहान नाही राहिलो आहोत", "(थोड़े जास्तीच) जाड झालो आहोत" वगैरे वगैरे मित्रानी सगळं खरंखरं सांगुन पोपट केला होता...
असुदे.. आपण "लै भारी" नाही, हे चांगलंच आहे..
वय वाढलं की काही लोकं उगाच फार मोठं झाल्यासारखं वागतात...
तुम्ही सांगा, तुम्हाला तुम्ही आहात तेवढ्या वयाचे झाला असं वाटतं का? जाउदे..
आपला अजुन टाइम पास चालूच आहे... मागच्या वर्षी फ्लैटचं टायमिंग चुकवून आपण केलेला पराक्रम आठवला, आणि मलाच हसू आलं... बाकी मी केलेला हा एकमेव आर्थिक घोटाळा असेल...
आता हा २५वा वाढदिवस..
थोरामोठ्यानी सांगितलं आहे:- "गद्धे-पञ्चविशी" बद्दल!
त्यामुळे या वर्षी हवा तितका "गद्धेपणा" करता येइल..
हे सगळं लगेच सांगुन "गद्धेपणा" करायला नको, म्हणुन मी म्हटलं, रेजोल्युशन असं आहे की :- "येत्या आर्थिक वर्षात वजन क्षक्ष च्या पुढे जाऊ न देणे..."
शेवटी काय, आपल्या वाढदिवसादिवशी आपल्या आवडीच्या लोकांकडून "आठवणीने फ़ोन-मेसेज येणे", त्यातल्या काही लोकांबरोबर "स्नेह-भोजन" होणे वगैरे झालं की बस.. या सगळ्यात "वय वाढवायची" काय गरज आहे, नाही का??
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)