नमस्कार मित्रा.
आज "लिटील चैम्प्स"चा शेवटचा एपिसोड पाहिला आणि लक्षात आले, "आता हे सम्पणार.."म्हणुन हा "ब्लोग-प्रपन्च". एक छोटासा आढावा...
मी परदेशात रहातोय... तरीही हे सारे एपिसोड्स नेहेमी, वेळच्या वेळी बघु शकायचो, याचे श्रेय तुलाच मित्रा..इथे तुझे नाव तर लिहिता येणार नाहि, पण कदाचित तु हे वाचशील अशी आशा....
सान्गायचा मुद्दा असा की माझ्यासारखे असे किती जण असतील, आहेत- जे महाराष्ट्राबाहेर,देशाबाहेर रहातात, आणि "प्रत्येक" शनिवार सकाळ (मी शुक्रवार रात्रीच!), "सा रे ग म प" बघण्यासाठी मोकळी ठेवतात?! शनिवार, रवीवारी मित्रान्न भेटलो कि चर्चा हीच-" प्रथमेश काय गायला..." "आर्या भारी आहे", "मुग्धा"... "रोहीत"... "कार्तिकी"...
"शाल्मली जायला नको होती...." ... एक ना अनेक... सगळे बोलणे चान्गलेच होते, असेही काही नाही... . वाद होतेच :-)
तर कार्यक्रमाबद्दल बोलायचे तर सुरुवात करावी लागेल "चाबुक" गुप्ते यान्च्यापासुन... या सर्व एपिसोड्स मधे त्याने इतकी मजा आणली, की काही विचारु नका! मधुन मधुन उगाचच त्यान्च पल्लवी आणि सामन्त बाइन्ना छेडणे बघुन गम्मत वाटायची.. वेगवेगळे किस्से, उपमा ऐकताना छान मजा यायची. त्याने गायलेले "आयुष्य हे" गाणे तर जबर्दस्तच. "तोडलस अवधूत मित्रा!" "कडक... क-ड-क!"
पल्लवी "क्या बात है" जोशी! "तिच्या सुत्रसन्चालनात तोच-तोचपणा आहे...", कधी कधी "मराठी असुनही हिला स्वतहाचे मराठी सुधारता येत नाही का, हे पाचवे शेड्युल आहे" वगैरे कमेन्ट्स वाचले, पण शेवटी एवढ्याशा गोष्टीमुळे तिचे क्रेडीट काढुन तर नाही घेता येणार..." प्रसन्न चेहेर्याने नेहेमी सर्वान्चे स्वागत करणारी, पर्फ़ोर्मन्स डाउन झाला एखाद्याचा तर चिअर अप करणारी ती पल्लवीच होती! थोडे मन मोठे करुया!?!
वैशाली सामन्त अशा वेळी दिसुन यायची, जेव्हा अवधुत दादा जरा जास्तीच लहान व्हायचा किन्वा "पर्फ़ोर्मन्स" बद्दल अति करायचा. तेव्हा मुलान्शी नीट, चान्गल्या शब्दात बोलुन उणीवा, चुका सागणारी वैशाली सामन्त होती.
म्युझीशीयन्स चे जितके कौतुक करावे तितके कमीच. अलिकडल्या एपिसोड्स मधले "चम चम" अप्रतीम होते! सगळॆच एकमेकान्च्या तोडीस तोड!
यात अजुन मजा आणली ती काही मान्यवरान्नी. शन्कर महादेवनचा एपिसोड कोणी विसरु शकणार नाही. आशा खाडिलकर बाइन्चे मार्गदर्शन छान होते.. सन्जीव अभ्यन्कर! देवकी पन्डीत! मुलान्मधे आलोय म्हणुन उगाच मोठेपणा दाखवला नाही विशेष कोणी!
पण यात सर्वात शिखरावर होते, पन्डीत ह्रुदयनाथ मन्गेशकर! त्यान्ची "शिवकल्याण राजा" मधली गाणी ऐकुन, स्वातन्त्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवन्त फ़डके यान्च्या गोष्टी ऐकुन मनातला सह्याद्री पेटुन उठला. एकुणच मराठी माणसाच्या "आयडेन्टीटी", "स्वाभिमाना"मधे एक मोठी भर टाकणारा असा हा कार्यक्रम ठरला. काळाच्या ओघात हरवलेली, सध्या जुनी झालेली किती तरी गाणी या निमित्ताने परत आपल्यासमोर आली.अवधुतने व्यक्त केलेली, "या सर्वान्ना घेवुन सन्गीत नाटक बसवा" ही इच्छा जेव्हा/जर प्रत्यक्षात येईल, तो दिवस सोन्याचा!
काही सन्माननिय अपवाद वगळता, हिन्दी मधे गाण्याच्या नावाखाली जो काही प्रकार चालु असतो, तो पाहुन परत काही ते पहायची इच्छा नसताना हा कार्यक्रम आला आणि वेड लावुन गेला.... हिन्दी मधली "नौटन्की"पाहता यात कधी कधी झालेली तथाकथित पार्शालिटी सोडुन देवु शकु आपण कदाचीत.
शेवटी आभार झी मराठीचे, महाराष्ट्राच्या महान सन्गीत परम्परेची झलक दाखवुन देणारा,कामातली सारी टेन्शन्स, कन्टाळा, कधी निराशा दुर करणारा, इतका सुखद-सुन्दर कार्यक्रम बनवल्याबद्दल! लिटील चैम्प्सना गाण्याच्या व्यतीरिक्त इतरही मार्गदर्शन दिल्याबद्दल!
मोठे होवुन यान्च्याकडुन सम्पुर्ण महाराष्ट्रावर सुन्दर गाण्यान्चा अखन्ड वर्षाव होत राहो,ही प्रार्थना! आणि मोठे व्हायला वेळ आहे, तोपर्यन्त देखील!
मित्रा, परत एकदा धन्यवाद, "नेहेमी", "सा रे ग म प लिटील चैम्प्स" चे एपिसोड्स पोस्ट केल्याबद्द्दल.. शुभेच्छा! जय महाराष्ट्र!
या फ़ोटोचे मालक http://www.zeemarathi.com/SRGMPLittleChamps2008
२ टिप्पण्या:
सुरेखच झाला सर्व कार्यक्रम. काय त्या मुलांची तयारी अन् काय तो विनयशीलपणा. शेवटी राहिलेले पांचही जण म्हणजे पंचमहाभुतं होती ती.
todlas mitra.........agadi manapasoon lihila ahes......agadi gharat yewoon shoes kadhta kadhta mhanaychas na "***** aaj kahi tari **** lava"....agadi tasa.......!
टिप्पणी पोस्ट करा