गुरुवार, १९ मार्च, २००९

" ओत्सुकारे सामा देस! "

अतिकामासाठी प्रसिद्द असलेले जपानी, कामाहून परत जाताना एकमेकांना बाय बाय करताना म्हणतात :-
"ओत्सुकारे सामा देस! "
अर्थ? कंपनी साठी तू किती काम करतो आहेस, मान मोडून वगैरे! तर तू, "दमलास रे~ बाबा/बार्बी"

पहिल्यांदा ऐकलं तेव्हा लय भारी वाटलं होतं!
कोणी आपल्याला म्हनलं, की आपण पण लगेच, आदरपूर्वक :- "ओत्सुकारे सामा देस!"

ती :"तुमच्या भाषेत काय म्हणतात याला?"
"असं म्हणायची पद्धत नाही! "मी ...

मी काही अंग्रेज मित्रांना विचारलं तर ते म्हणाले, "वाट द टिम्ब-टिम्ब " ?
तर असं हे, जपानचं बर्यापैकी ओरिजनल!


कधी वापरतात?
सकाळी कंपनीत आलो, तासभर काम झालं, की चालु!
कमरेत थोडंसं वाकून "दमलास हो!, ओत्सुकारे सामा देस..."

टिप :- इथून पुढे "$#¥" आलं, की वाचा :- "ओत्सुकारे सामा देस..."

मीटिंग चं ओपनिंग :- समस्त लोकहो, "$#¥!"
आपण ह्यँव करू... त्यँव करू... ओके? इसी बात पे, "$#¥!"
कोणाचा
फ़ोन आला की, "$#¥!"
कामानिमित्त बाहर जाउन आलं की खोलीत प्रवेश करताना:- "$#¥!"

आता काम करताना मधून मधून आपण जागेवरून उठत असतो..
तेव्हा वाटेत कोणी दिसला रे दिसला कि लग्गेच! :- ओह! "$#¥!"
अरे XX.... मला लय झोप येतीये, एक कॉफी मारायला चाललोय, "$#¥!" कसलं डोम्बल!?


बर, कामात ठीक...


नोमिकाई मधे मदिरेचे चषक उडवत जयघोष एकच :- "$#¥!"
रात्री ट्रेन मधून परत येताना नोमिकाई करून आलेले लोक एकमेकांना म्हणतात :- "$#¥!"

कोलेज मधली पोरं-पोरी... एकमेकांना बाय बाय करताना "$#¥!"
शाळेत सर/म्यादम पोरांना :- अर्धा तास झाला! लय अभ्यास केलात, " $#¥!"
मित्राचा फ़ोन आला तरी :- " $#¥!" खेळायाला येतोस काय?
अरे, तो ट्रेन चा कंडक्टर, तोही सगल्या प्रवाशांना उद्देशून "लोकहो, प्रवास करून दमलात, "$#¥!"

अरे काय चालवलंय काय?
जपानचे नाव बदला आता, आणि हेच ठेवा :- " $#¥!"
आणि एवढंच जर दमताय तर कोणी सान्गितलय? झोपा की गप घरी!!


मागे एकदा एक मित्र सांगत होता:-
"काल कंपनीत जरा एक छोटा डाउट आला होता म्हणुन गेलो होतो..." (डाउट->शंका)
तर तिथे श्री सुझुकी दिसला.. एरवी कंपनीत कामासाठी माझ्या शेजारीच बसतो..
आत्ता बराच वेळ जागेवर नव्हता.. नेमका इथे दिसला. त्याचा मोठा डाउट होता वाटतं..

बंड्याने माझ्याकडे बघितलं.. आता मला बघून म्हणतो कसा,
ओह, "$#¥!"
मी पण म्हनलं, नाही नाही बाबा ... किमान आत्ता तरी तूच माझ्यापेक्षा डबल, "$#¥!"


ऐका , साक्षात जपानी पोरीच्या तोंडून, हेल काढून म्हटलेले :- ओत्सुकरेसमा देश्ता!

शनिवार, १४ मार्च, २००९

पिंटू

"गुड"... "गुड मूवी"
हेड फ़ोन काढत बाता म्हणाला... साहेबांनी कुठे तर स्लमडॉग पाहिला होता.

"हिरोइन काही ख़ास नाही आहे..
कोणीही चालली असती..."

बरोबर आहे म्हणा... तिचे फोटो बघितले आणि असंच वाटलं होतं...
हिच्यापेक्षा आपल्या कोलेजातली "ती" पण चालली असती, बाता म्हणाला...
...
...
...
...

आणि आज महाराष्ट्र टाइम्स मधे पाहिलं, "पिंटू का पेरिस में जलवा! कैट मोस को हराया!"
फोटो बघितले तर काय भारी! लयच भारी!"



तेव्हाच आपल्या बॉलीवुड स्टार्स चे पण फोटो बघितले, रिअल लाइफ.. (@चि. सौ. कां. अमृता अरोरा शुभ विवाह)
बिचारे अगदीच आपल्या सारखे दिसत होते...
साधे, घामेजलेले... सर्व साधारण इंडियन... (कम ओन, इंडियन=घमेजलेले असा याचा अर्थ नाही!)

त्यात "आपल्या" प्रियांकाचा फोटो पण होता.. ती पण बिचारी फारच साधी दिसत होती।
शेजारी ती बया होतीच, कटरीना... (असं प्रियांकाला वाटत असेल असं आम्हाला वाटतं, कारण ती येई पर्यंत प्रियांका नंबर वन होती ना...) ती मात्र लय भारी! इम्पोर्टेड ना ती!

ती करीना. बारीक होण्यासाठी तिनं जेवण सोडलं..

तुमची ऐश्वर्या. तिने किती काय नाही केलं? अमेरिकेत असणार्या पंजाबी लोकांच्या पिक्चर मधे काम करून, "मी होलीवुड मधे" म्हनाय लागली...

आपला अमिताभ! (त्याच्या बायकोच्या एंटी मराठी कमेन्टमुळे मी इथे "तुमचा" पण म्हणू शकतो...) त्याने इतके पिक्चर केले... एवढा भारी गेम शो केला.. पण ग्लोबल लेवलचं क्रेडिट अनिल कपूर ला!

शाह रुख... आमिर॥ एवढे नाचले, पण त्यांना हॉलीवुड मधे काही नाही मिळालं!
आमिर खान ने तर हाईट केलि! तरी बरं, गझिनी ला ओस्कर मधे नै नेलं... बरोबर आहे, तो तिथल्याच पिक्चर वरून उचलला आहे, लाज गेली असती। तेवढा हुशार आहे तो...

एकुण काय, तर सगळे भारी भारी लोक जळुन खाक झाले! ( मला लय आनन्द झाला! :) )

पण नक्की काय खरं म्हणजे?
कोण कुठली पिंटू पोरगी, एकदम येते आणि आपल्या लोकांशी कोम्पीटीशन न करता एकदम "Goes Global" का काय ते??
म्हणजे काम-कष्ट वगैरे आहेच , पण शेवटी नशीबच खरं का??

पण काही म्हणा, पोरगी कोंफीडन्त वाटते! इंग्लिश भारी बोलते! चांगलंच आहे।
सो विश हर आल डा बेष्ट!