बरेच दिवसांनी आज सुट्टी मिळाली.
शनिवार, रवीवार... कसली सुट्टी ? क्लायंटचं नुकसान होइल ना नाहीतर..
अशा सगळ्यात आजचा दिवस उजाडला..
"सकाळ"ची "संध्याकाळ" कशी झाली, कळलंच नाही... आराम चालू होता...
बाहेर गैलरीत आलो...
थोड्याच वेळापूर्वी बाहेर शांत निवांत आसमंत होतं ...
आणि आता पाहतो तर काय?
"पा - उस असा ~ रुण - झुण ♪ ता~"
आपले संदीप-सलिल गात होते.. एकदम धो धो गात होते...
आपली कोणी सखी नाही, पैन्जणे कोठली स्मरता?
सखी जाऊ द्या.... आज तर रक्षाबंधन! पण इथे नारळी भात कुठे मिळायला??
मी म्हटलं, चला! आपण आपलं " भजंन " करावं??
असंही पाउस आयता आलेला आहेच....
आईन दिलेलं डाळिचं पीठ काढलं... बरोबर होता:- ओवा आणि खाण्याचा सोडा !!!
मग काय?
चिरला कांदा, भिजवलं पीठ...
तापवलं तेल आणि पहिलं भजं केलं...
खावुन पाहिलं!!
कसं होतं ??
"भजं" झालं होतं...
उत्साहात तिखटच घालायचं विसरलो होतो...
"पा - उस असा ~ रुण - झुण ♪ ता~"
खेकडा भजी करायचा पिलान होता, पण या खेकडयाने आधीच का नांगी टाकली आहे??
नंतर कळलं , कारण मी पीठ भिजवताना त्याच्याशी ज़रा जास्तीच कुस्ती केली होती...
दूसऱ्या lot ला जास्ती न छळता, प्रेमाने भिजवलं गेलं...
त्यामुळे दूसरा lot जास्ती त्रास नं देता निघाला....
भांडं ज़रा मोठं घ्यायला हवं होतं....
एका वेळी तीनच भज्या...
पाणी जरा जास्ती झालं होतं..
पीठ वाढवा...
कोरडं झालंय...
कांदा वाढवा...
असं करत, दीड तासाने भजं झालं!
फ़क्त एकदाच चटका बसला..
ते म्हटलं आहे ना?
आधी हाताला चटके, मं गं ...
मं गं मिळतं रे ~
”भजं ” ^_^
शनिवार, १६ ऑगस्ट, २००८
मंगळवार, ५ ऑगस्ट, २००८
|| संस्कृती ||
प्रत्येक देशाची एक संस्कृती असते..
संस्कृती म्हटलं की त्यात बरेच उप प्रकार येतात..
वेशभूषा संस्कृती!
भाषा संस्कृती!!
खाद्य संस्कृती!!! ( अरे, ही तर आद्य संस्कृती... )
आपल्या भारताची जशी ४ हजार वर्षांपूर्वीची संस्कृती आहे, तशीच इथली, अर्थात
जपानचीही आहे...
पण त्यात घुसणे म्हणजे ते महानगर पालिकेच्या उंदीर मारण्याच्या विभागातल्या शिपायाने अनुयुद्ध टाळण्यावर मत मांडल्यासारखं होईल.... त्यामुले आपण आपलं, जे सध्या दिसतं आहे, त्यावर थोड़ा "प्रकाश पाडो~ का ना~ " तो ओमोत्ता वाके देस ने ..... (असं वाटलं इतकंच...)
सुरुवात करताना आद्य संस्कृती, खाद्य संस्कृती पासून सुरुवात करावी का?
तर ही मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे... आमच्या प्रोजेक्ट मधला एक जण प्रोजेक्ट वरून मुक्त झाला!
त्याची बाय बाय नोमिकाई होती...
पहिला थोड़ा वेळ प्रोजेक्ट बद्दलच्या फालतू गप्पात गेला....
तेवढ्यात आर्डर आली.... "कोकसान!"
कोणीतरी पुकारा दिला , " जय जपान!!" लगेच जवाब आला, "जय कोकसान!!"
"कान पाय! "
आणि ...पाट...वाहू...लागले...
(साधारण अर्ध्या तासाने...)
"काय सांगू भाऊ?? " तो मित्र म्हणत होता... मागच्या आट्टवड्यात मी एक होटेलात गेल्तो...
तित्तं काय मायती का???
"काय?"
"पण खरं सांगतो भाऊ ..."
"काय?"
" नंतर कळलं बगा... की "उंदीर", बर का.... "उंदीर" ही काय खायची वस्तु नाय... "
जपानी भाषा शिकायला लागल्यावर माझी अणि माझ्या काही मित्रांची "जय जपान" अशी काहीतरी अवस्था झाली होती.. त्यात काही जपानी मित्र-मैत्रिणी भेटले आणि मग काय? पुण्याच्या रस्त्यावरून फिरत आम्ही "किती बैड लक... पुण्यात साधी सुशी मिळत नाही.." "शी!!" वगैरे म्हणत फिरत असायचो...
- देव सारं काही पाहत असतो... त्याने बरोबर आम्हा सार्यांची विच्छा पूर्ण केली, आणि आम्ही जपानात आलो...
राइनिची (जपानला यायचं करणे) करणारया उमेद्वार लोकांना एकंदरीत असं होत असावं :-
सोबा, उदोन, वासाबी॥
तेंपुरा, सुशी, तेरियाकी॥
थाकोयाकी आणि याकिसोबा ॥
बाकी आता मला काई नको बाबा॥
नव्याची नवलाई, ३-४ महिन्यानी का होइना, संपली आणि या पदार्थांचा कंटाला येवू लागला!!
सुरुवातीला शेड्यूल ठीक असल्याने घरी जेवण तयार करणे चालू होतं.. नंतर ते जमेनासं झालं आणि जपानच्या खाद्य संस्कृतीची ओळख व्हायला सुरुवात झाली....
२४ तास सुरु असणारी कोंबिनी( Convnient Stores)!! यातून मिळणारा ओबेन्तो, तो घरी येवू लागला....
"एकदा तयार केलेले जेवण २ दिवस चांगले राहते. (थंड वातावरणात)!! "वरील तत्त्वावर असलेले ओबेन्तो गिर्हैकाने विकत घेतले, की "गरम करून पायजे का?(साहेब)" असं विचारलं जातं... मग ते जेवण गरम करून खायचं... "आयडिया चांगली आहे!"
सहज कंटेंट बघावे म्हटलं, तर "खाद्य पदार्थाचा एक घटक म्हणुन समाविष्ट" या यादीत "डुक्कर", "डुक्कर-तेल ", "कोम्बडि" आणि "सन्त्रं !"
म्हणजे, एखाद्या "जपानी" "खाना-खजाना" मधे काय सांगत असतील, तर :
पदार्थ : "दम डुक्कर" किंवा "डुक्कर दो प्याजा"
थोडी भाजी घ्या..
ती अशी लाम्ब लाम्ब चिरून घ्या...
एक माध्यम आकाराचे डुक्कर घ्या....
देशी डुक्कर चांगलं...
...
...
ते मंद आचेवर तलुन घ्यायचं॥
"तेल, कुठलंही चालेल का?"
"लक्षात ठेवा,यासाठी शुद्ध देशी डुक्कर तेलंच घ्यायचं, नाहीतर घर के जेवण का स्वाद येत नाही!!"
दूसरा एखादा "पुलाव" करताना, तिथली एखादी बाई सांगेल,
"सर्व्ह करताना त्यावर थो-डंसं डुक्कर भुरभूरा!! "
किंवा
डुक्कर :- "चवीपुरतं"
"जपानी लोकांचं मुख्य अन्न हे भात असून, त्यांच्या आहाराताले सारे पदार्थ, हे समुद्रजन्य असतात।" - असं आपण "जपानी भातशेती" या टैपच्या शालेय धड्यात शिकलोच... आजच्या घडीला मात्र हे पूर्णपणे खरं नाही असं म्हनावं लागेल.. अमेरिकन कंपन्यान्नी केलेल्या मार्केटिंग मुळे आणि जपानी लोकांच्या ऊँची वाढवाण्याच्या इछेमुळे असं झालं म्हणे! तर आजकाल टिपिकल फॅमिली रेस्तराँ मधे काय मिळेल तर:-
१) ताजं अमेरिकन बीफ आणि (चिकट) जपानी भात!
२) ताजं ऑस्ट्रेलियन बीफ आणि (चिकट) जपानी भात!
३) ताजं इटालियन चीज आणि (इटालियनच) नुडल्स! इत्यादि इत्यादि..
बरोबर "ड्रिंक-बार" हवंच!
"२५० येन मधे हवे तेवढे (सॉफ्ट) ड्रिंक प्या!!" इति ड्रिंक-बार..
त्यामुले, नवशिक्याला "ड्रिंक-बार" पहिल्यांदा बघितला, की "(चायला), आपल्या भारतात पण ड्रिंक-बार सिस्टिम यायला पायजे असं हमखास वाटतं!
काही जणांना कंसाताल्या "सॉफ्ट" शब्दाचा भारी राग येतो! पण फॅमिली रेस्तराँ असल्या कारणाने, त्यांना अपेक्षित असलेली "शिष्टिम" तिथे नसते..
भारतात असल्यापासूनच जपानी जेवणात फार रस होता.. बर्याच पदार्थांची माहिती मिलवली होती..
ती वर लिहिली आहेच! "पण त्यातले आपण खाऊ शकणारे पदार्थ खायचे असतील तर ते "इनाका" (खेड्या!) मधे जाउनच!" अशा टैपचा चंग बांधल्यामुले, बरेच महीने त्याची प्रतीक्षा करावी लागली ..
शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला.. इनाकात गेलो..
जपानी सोबा(बकव्हीट) पासून बनवलेले "सोबा नुडल्स", "सोबाच्या (च्या = चहा )", आणि शेवटी
"सोबा आइस क्रीम" सुद्धा! वाह!!! खरंच छान दिसत होता हा सोबा!!!
"जपानी सोबाची काही लोकांना अलेर्जी असते.. काही लोक सोबा खाऊन लगेच मरतात सुद्धा !!!"
तिथल्या होस्ट साहेबांनी आम्हाला वाढता वाढता पुढीलप्रमाणे माहिती पुरवली!!
"ओ घ्या की, लाजायलाय काय?!" हे होतंच!!!
त्यांना चार पाच घास खाताना पाहून मग आम्ही चालू केलं..
त्यांच्या खाण्याच्या पद्धतीकडे पाहून प. पु. फरीदा जलाल यांनी दिलेला "सुर्र के पीओ!" हा संदेश, जपानी लोकांनी कुठे ऐकला, याचा मी विचार करू लागलो.. "खुप सार्या सोबाच्या पाण्यात लांबच लांब सोबा नुडल्स टाकलेल्या असतात! " अशा त्या नुडल्स एक तर काड्यान्नी उचलायच्या! आणि त्या तोंडाने आवाज करत, "सुर्र के आत ओढून खाओ!" असा हा प्रकार.. काय माहित? ट्रांसलेशन मधे थोड़ा "पी" चा "खा" झाला असावा असा आपला एक अंदाज.. सोबाची चव मात्र ब्येष्ट!
"नॉन वेज न खाणार्या लोकांचं काय?" चं उत्तर ठिकठिकाणी असलेल्या "इन्दो-र्यौरीयासान" अर्थात "भारतीय पद्धतीच्या खाणावळीत" मिलतं... (त्या खाणावळी नसून होटेल्स आहेत हे माहीत आहे, पण खाणावळी शब्द वापरायचा म्हणुन... माफ़ी असावी) अशा या इन्दो-र्यौरीयासान मधे हमखास बघायला मिलनारे दृश्य म्हणजे एखादा भारत प्रेमी जपानी मनुष्य, हा आपल्या ओळखीच्या एखाद्या इन्दोजिनला (भारतीय माणसाला) घेउन जेवायला आलेला असतो.. असा हा मनुष्य सहसा आपल्या तरुणपणी (तेव्हा अविकसित / विकसनशील!?!?) अशा आपल्या देशात येउन गेलेला असतो. तेव्हाचे दिवस आठवून, भारतीयाला "सांग सख्या रे, आहे का तो अजुन तैसाच! साधा - सुंदर.." असं काहीतरी विचारित असतो...
(क्रमशः)

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)