शनिवार, ११ एप्रिल, २००९
इण्टरव्ह्यू-संपूर्ण
शुक्रवार, ३ एप्रिल, २००९
इंटरव्ह्यू
वेळही ठरली,
लोकं जमली,
मीटिंग भरली...
भारत देशा,
वंदन करूनी,
इंटरव्ह्यूची
नांदी झाली...
जमले होते,
काही देशी,
होते तेथे
काही जपानी...
इन्दो-र्योरी,
चाखत चाखत,
गप्पाना मग
रंगत आली....
स्थळ: भारतीय रेस्तारौं, टोकियो, जपान.
वेळ:- असाच एक शनिवार. दुपारी साधारण ११:३०वाजता.
पात्रे :- मी आणि एक जपानी जोडपं.
प्रसंग: - "इंटरव्ह्यू~!"... नाही नाही.. "स्नेहभोजन!!!"
(क्रमशः)
गुरुवार, १९ मार्च, २००९
" ओत्सुकारे सामा देस! "
"ओत्सुकारे सामा देस! "
अर्थ? कंपनी साठी तू किती काम करतो आहेस, मान मोडून वगैरे! तर तू, "दमलास रे~ बाबा/बार्बी"
पहिल्यांदा ऐकलं तेव्हा लय भारी वाटलं होतं!
कोणी आपल्याला म्हनलं, की आपण पण लगेच, आदरपूर्वक :- "ओत्सुकारे सामा देस!"
ती :"तुमच्या भाषेत काय म्हणतात याला?"
"असं म्हणायची पद्धत नाही! "मी ...
मी काही अंग्रेज मित्रांना विचारलं तर ते म्हणाले, "वाट द टिम्ब-टिम्ब " ?
तर असं हे, जपानचं बर्यापैकी ओरिजनल!
कधी वापरतात?
सकाळी कंपनीत आलो, तासभर काम झालं, की चालु!
कमरेत थोडंसं वाकून "दमलास हो!, ओत्सुकारे सामा देस..."
टिप :- इथून पुढे "$#¥" आलं, की वाचा :- "ओत्सुकारे सामा देस..."
मीटिंग चं ओपनिंग :- समस्त लोकहो, "$#¥!"
आपण ह्यँव करू... त्यँव करू... ओके? इसी बात पे, "$#¥!"
कोणाचा फ़ोन आला की, "$#¥!"
कामानिमित्त बाहर जाउन आलं की खोलीत प्रवेश करताना:- "$#¥!"
आता काम करताना मधून मधून आपण जागेवरून उठत असतो..
तेव्हा वाटेत कोणी दिसला रे दिसला कि लग्गेच! :- ओह! "$#¥!"
अरे XX.... मला लय झोप येतीये, एक कॉफी मारायला चाललोय, "$#¥!" कसलं डोम्बल!?
बर, कामात ठीक...
नोमिकाई मधे मदिरेचे चषक उडवत जयघोष एकच :- "$#¥!"
रात्री ट्रेन मधून परत येताना नोमिकाई करून आलेले लोक एकमेकांना म्हणतात :- "$#¥!"
कोलेज मधली पोरं-पोरी... एकमेकांना बाय बाय करताना "$#¥!"
शाळेत सर/म्यादम पोरांना :- अर्धा तास झाला! लय अभ्यास केलात, " $#¥!"
मित्राचा फ़ोन आला तरी :- " $#¥!" खेळायाला येतोस काय?
अरे, तो ट्रेन चा कंडक्टर, तोही सगल्या प्रवाशांना उद्देशून "लोकहो, प्रवास करून दमलात, "$#¥!"
अरे काय चालवलंय काय?
जपानचे नाव बदला आता, आणि हेच ठेवा :- " $#¥!"
आणि एवढंच जर दमताय तर कोणी सान्गितलय? झोपा की गप घरी!!
मागे एकदा एक मित्र सांगत होता:-
"काल कंपनीत जरा एक छोटा डाउट आला होता म्हणुन गेलो होतो..." (डाउट->शंका)
तर तिथे श्री सुझुकी दिसला.. एरवी कंपनीत कामासाठी माझ्या शेजारीच बसतो..
आत्ता बराच वेळ जागेवर नव्हता.. नेमका इथे दिसला. त्याचा मोठा डाउट होता वाटतं..
बंड्याने माझ्याकडे बघितलं.. आता मला बघून म्हणतो कसा,
ओह, "$#¥!"
मी पण म्हनलं, नाही नाही बाबा ... किमान आत्ता तरी तूच माझ्यापेक्षा डबल, "$#¥!"
ऐका , साक्षात जपानी पोरीच्या तोंडून, हेल काढून म्हटलेले :- ओत्सुकरेसमा देश्ता!
शनिवार, १४ मार्च, २००९
पिंटू
हेड फ़ोन काढत बाता म्हणाला... साहेबांनी कुठे तर स्लमडॉग पाहिला होता.
"हिरोइन काही ख़ास नाही आहे..
कोणीही चालली असती..."
बरोबर आहे म्हणा... तिचे फोटो बघितले आणि असंच वाटलं होतं...
हिच्यापेक्षा आपल्या कोलेजातली "ती" पण चालली असती, बाता म्हणाला...
...
...
...
...
आणि आज महाराष्ट्र टाइम्स मधे पाहिलं, "पिंटू का पेरिस में जलवा! कैट मोस को हराया!"
फोटो बघितले तर काय भारी! लयच भारी!"
तेव्हाच आपल्या बॉलीवुड स्टार्स चे पण फोटो बघितले, रिअल लाइफ.. (@चि. सौ. कां. अमृता अरोरा शुभ विवाह)
बिचारे अगदीच आपल्या सारखे दिसत होते...
साधे, घामेजलेले... सर्व साधारण इंडियन... (कम ओन, इंडियन=घमेजलेले असा याचा अर्थ नाही!)
त्यात "आपल्या" प्रियांकाचा फोटो पण होता.. ती पण बिचारी फारच साधी दिसत होती।
शेजारी ती बया होतीच, कटरीना... (असं प्रियांकाला वाटत असेल असं आम्हाला वाटतं, कारण ती येई पर्यंत प्रियांका नंबर वन होती ना...) ती मात्र लय भारी! इम्पोर्टेड ना ती!
ती करीना. बारीक होण्यासाठी तिनं जेवण सोडलं..
तुमची ऐश्वर्या. तिने किती काय नाही केलं? अमेरिकेत असणार्या पंजाबी लोकांच्या पिक्चर मधे काम करून, "मी होलीवुड मधे" म्हनाय लागली...
आपला अमिताभ! (त्याच्या बायकोच्या एंटी मराठी कमेन्टमुळे मी इथे "तुमचा" पण म्हणू शकतो...) त्याने इतके पिक्चर केले... एवढा भारी गेम शो केला.. पण ग्लोबल लेवलचं क्रेडिट अनिल कपूर ला!
शाह रुख... आमिर॥ एवढे नाचले, पण त्यांना हॉलीवुड मधे काही नाही मिळालं!
आमिर खान ने तर हाईट केलि! तरी बरं, गझिनी ला ओस्कर मधे नै नेलं... बरोबर आहे, तो तिथल्याच पिक्चर वरून उचलला आहे, लाज गेली असती। तेवढा हुशार आहे तो...
एकुण काय, तर सगळे भारी भारी लोक जळुन खाक झाले! ( मला लय आनन्द झाला! :) )
पण नक्की काय खरं म्हणजे?
कोण कुठली पिंटू पोरगी, एकदम येते आणि आपल्या लोकांशी कोम्पीटीशन न करता एकदम "Goes Global" का काय ते?? म्हणजे काम-कष्ट वगैरे आहेच , पण शेवटी नशीबच खरं का??
पण काही म्हणा, पोरगी कोंफीडन्त वाटते! इंग्लिश भारी बोलते! चांगलंच आहे।
सो विश हर आल डा बेष्ट!
शनिवार, २१ फेब्रुवारी, २००९
पुरेतोरे
त्यात टिपिकल जपानी पद्धतीप्रमाणे, आधी "काय काय करायचं नाही" याबद्दल मोठी यादी होती..
म्हंजे अगदी लाल फॉण्ट मधे... बोल्ड आणि अन्डर्लाइन करून... (ब्लॉगर मधे अन्डर्लाइन नाही आहेरे!
नवा शोध!)
मग आलं:- आपण हे शिकाल...
आणि नंतर काय तर होतं:- "पुरे तोरे"
मला बर्यापैकी जपानी कळतं... माझं जावूद्या..
त्या डिक्शनरीलाही वाचता येवू नये? अर्थ कळु नये?
जरा नीट विचार केला,
आणि नंतर समजलं:-
"प्री ट्रेनिंग" ला जपानी मधे "पुरेतोरे" म्हणतात..
पुरे तोरे हा "पुरे- तोरे-निंगु" चा शोर्ट फॉर्म!
अशी ही जपानची "काताकाना" भाषा!
जपानी सोडून बाकी भाषेतले शब्द बोलण्यासाठी तयार केली गेली.
आता प्रश्न असा येतो, की हा "काताकाना" शब्द म्हंजे जपानी नाही, हे समजलं..... पण म्हणुन ते इंग्लिश असेलच असं नाही..
"आरू बाइतो" घ्या.
"पॉकेट-मनी" साठीचा हा शब्द. मुळचा "जर्मन!" :- "arbeit"
आता हे आम्हाला कुठून कळणार ???
जाउदे...
चला.. "पुरे" झालं.. निघाला राग...
शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २००९
सुखद-सुन्दर
आज "लिटील चैम्प्स"चा शेवटचा एपिसोड पाहिला आणि लक्षात आले, "आता हे सम्पणार.."म्हणुन हा "ब्लोग-प्रपन्च". एक छोटासा आढावा...
मी परदेशात रहातोय... तरीही हे सारे एपिसोड्स नेहेमी, वेळच्या वेळी बघु शकायचो, याचे श्रेय तुलाच मित्रा..इथे तुझे नाव तर लिहिता येणार नाहि, पण कदाचित तु हे वाचशील अशी आशा....
सान्गायचा मुद्दा असा की माझ्यासारखे असे किती जण असतील, आहेत- जे महाराष्ट्राबाहेर,देशाबाहेर रहातात, आणि "प्रत्येक" शनिवार सकाळ (मी शुक्रवार रात्रीच!), "सा रे ग म प" बघण्यासाठी मोकळी ठेवतात?! शनिवार, रवीवारी मित्रान्न भेटलो कि चर्चा हीच-" प्रथमेश काय गायला..." "आर्या भारी आहे", "मुग्धा"... "रोहीत"... "कार्तिकी"...
"शाल्मली जायला नको होती...." ... एक ना अनेक... सगळे बोलणे चान्गलेच होते, असेही काही नाही... . वाद होतेच :-)
तर कार्यक्रमाबद्दल बोलायचे तर सुरुवात करावी लागेल "चाबुक" गुप्ते यान्च्यापासुन... या सर्व एपिसोड्स मधे त्याने इतकी मजा आणली, की काही विचारु नका! मधुन मधुन उगाचच त्यान्च पल्लवी आणि सामन्त बाइन्ना छेडणे बघुन गम्मत वाटायची.. वेगवेगळे किस्से, उपमा ऐकताना छान मजा यायची. त्याने गायलेले "आयुष्य हे" गाणे तर जबर्दस्तच. "तोडलस अवधूत मित्रा!" "कडक... क-ड-क!"
पल्लवी "क्या बात है" जोशी! "तिच्या सुत्रसन्चालनात तोच-तोचपणा आहे...", कधी कधी "मराठी असुनही हिला स्वतहाचे मराठी सुधारता येत नाही का, हे पाचवे शेड्युल आहे" वगैरे कमेन्ट्स वाचले, पण शेवटी एवढ्याशा गोष्टीमुळे तिचे क्रेडीट काढुन तर नाही घेता येणार..." प्रसन्न चेहेर्याने नेहेमी सर्वान्चे स्वागत करणारी, पर्फ़ोर्मन्स डाउन झाला एखाद्याचा तर चिअर अप करणारी ती पल्लवीच होती! थोडे मन मोठे करुया!?!
वैशाली सामन्त अशा वेळी दिसुन यायची, जेव्हा अवधुत दादा जरा जास्तीच लहान व्हायचा किन्वा "पर्फ़ोर्मन्स" बद्दल अति करायचा. तेव्हा मुलान्शी नीट, चान्गल्या शब्दात बोलुन उणीवा, चुका सागणारी वैशाली सामन्त होती.
म्युझीशीयन्स चे जितके कौतुक करावे तितके कमीच. अलिकडल्या एपिसोड्स मधले "चम चम" अप्रतीम होते! सगळॆच एकमेकान्च्या तोडीस तोड!
यात अजुन मजा आणली ती काही मान्यवरान्नी. शन्कर महादेवनचा एपिसोड कोणी विसरु शकणार नाही. आशा खाडिलकर बाइन्चे मार्गदर्शन छान होते.. सन्जीव अभ्यन्कर! देवकी पन्डीत! मुलान्मधे आलोय म्हणुन उगाच मोठेपणा दाखवला नाही विशेष कोणी!
पण यात सर्वात शिखरावर होते, पन्डीत ह्रुदयनाथ मन्गेशकर! त्यान्ची "शिवकल्याण राजा" मधली गाणी ऐकुन, स्वातन्त्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवन्त फ़डके यान्च्या गोष्टी ऐकुन मनातला सह्याद्री पेटुन उठला. एकुणच मराठी माणसाच्या "आयडेन्टीटी", "स्वाभिमाना"मधे एक मोठी भर टाकणारा असा हा कार्यक्रम ठरला. काळाच्या ओघात हरवलेली, सध्या जुनी झालेली किती तरी गाणी या निमित्ताने परत आपल्यासमोर आली.अवधुतने व्यक्त केलेली, "या सर्वान्ना घेवुन सन्गीत नाटक बसवा" ही इच्छा जेव्हा/जर प्रत्यक्षात येईल, तो दिवस सोन्याचा!
काही सन्माननिय अपवाद वगळता, हिन्दी मधे गाण्याच्या नावाखाली जो काही प्रकार चालु असतो, तो पाहुन परत काही ते पहायची इच्छा नसताना हा कार्यक्रम आला आणि वेड लावुन गेला.... हिन्दी मधली "नौटन्की"पाहता यात कधी कधी झालेली तथाकथित पार्शालिटी सोडुन देवु शकु आपण कदाचीत.
शेवटी आभार झी मराठीचे, महाराष्ट्राच्या महान सन्गीत परम्परेची झलक दाखवुन देणारा,कामातली सारी टेन्शन्स, कन्टाळा, कधी निराशा दुर करणारा, इतका सुखद-सुन्दर कार्यक्रम बनवल्याबद्दल! लिटील चैम्प्सना गाण्याच्या व्यतीरिक्त इतरही मार्गदर्शन दिल्याबद्दल!
मोठे होवुन यान्च्याकडुन सम्पुर्ण महाराष्ट्रावर सुन्दर गाण्यान्चा अखन्ड वर्षाव होत राहो,ही प्रार्थना! आणि मोठे व्हायला वेळ आहे, तोपर्यन्त देखील!
मित्रा, परत एकदा धन्यवाद, "नेहेमी", "सा रे ग म प लिटील चैम्प्स" चे एपिसोड्स पोस्ट केल्याबद्द्दल.. शुभेच्छा! जय महाराष्ट्र!

या फ़ोटोचे मालक http://www.zeemarathi.com/SRGMPLittleChamps2008
बुधवार, २१ जानेवारी, २००९
काय काय आणि?
बोलायला काही नसलं की उगाच विचारायचं...
"काय काय आणि ?"
तर आज बोलायला काही नाहिये, पण दिवसभर (मधून मधून काम करता करता) एक ब्लॉग वाचला त्याबद्दल बोलायलाच पायजे.... अतिशय घाण (जपानीत कागदपत्रे तयार करण्याचं )काम करत असता भारी टी पी करून दिलेल्यांचे आभार मानलेच पायजेत...
कसला नाद-खुळा ब्लॉग! एक नाही दोन!
विषय "कन्टाळा" आणि "बाश्कळ बडबड"...
कसला क्रिएटिव ब्लॉग असावा एखाद्याचा !??
फुल फुल "ओ सुसुमे!" बोलेतो :- "I Recommend!"
"बाश्कळ बडबड": - www.bashkalbadbad.blogspot.com
"कन्टाळा": - www.kantala.blogspot.com
( हे लिहिताना त्या लेखांची परवानगी नाही घेतलेली, कन्टाळा आला ... )
हा ब्लॉग वाचून परत एकदा वाटलं, "आय टी पीपल" एकदम "दगड"!
i mean, IT people just Rock!