रविवार, १२ ऑक्टोबर, २००८

गुडलक!!!

सकाळी सकाळी ८.३० ला उठून, मुख मार्जन वगैरे केलं, आणि आमच्या बाता भाईंनी फर्माइश केली:-
"चल, गुड लक मधे जाउया.."
"चल..."

टोकियोत बाकी सगळा एकदम झगमगाट असला तरी काही काही होटेल्स अशी आहेत, की जी जुन्या काळापासुन जशी होती तशीच आहेत.. त्यातल्याच एकाला बाता भाई गुड लक म्हणतो...

तर असे हे गुड लक आमच्या घराशेजारीच आहे.. तिथे येणारे लोकही ठरलेले..
आम्ही दोघे तिथे असताना तिथल्या पाहुणे मण्डाळीन्चे सरासरी वयमान काढले तर साधारण ६०-६२वर्षे येइल!!! काळ बदलला की सगलं बदलतं.. जुन्या काळातल्या लोकांना आपलं, आपल्या वेळचं असं काहीतरी तिथे आहे, असं वाटत असावं कदाचित.. जपान मधे म्हातार्या लोकांचे प्रमाण खुप आहे, म्हणुनच "इतक्या लोकांचे गिर्हाइक कोण सोडेल??" अशा विचारात हे होटेल अजुन रेनोव्हेट वगैरे झालं नाही असं वाटलं.. तिथल्या वेट्रेस पण म्हातार्या!!

या होटेलात कितीही वेळ कोफी पित बसता येतं... कोणीही बिल आपटून जात नाही..
गुड लक सही अजुन एक साधर्म्य :- "धुवाँ-धुवाँ" "धुवाँ-धुवाँ" "धुवाँ-धुवाँ" "धुँवाही धुँवा!"

म्हातार्या लोकांसाठी ख़ास चश्मे ठेवले गेले आहेत... ४-५ वेगवेगळ्या नंबरचे असतील बहुतेक....
दहाबारा वर्तमान पात्रांच्या २-२, ४-४ कॉपीज ठेवल्या गेल्या आहेत...

वयाने बरेच मोठे लोक येवून एकमेकांना एकेरी मधे हाक मारत असतात, ते बघून एकदम भारी वाटतं..
इतकी वर्ष मैत्री निभावालेले मित्र भेटल्यावर एकदम मस्त वाटत असेल नाही?? "वाट्टेल त्या" विषयावर "वाट्टेल त्या पातळीवरून" चालु असलेलं संभाषण मी ऐकलं आहे... :)

-असं काही थोडंसं वेगळं ऐकलं, की जपानी भाषेत म्हणतात:- "मासाका?" (म्हणजे: "हट.. खरंच??")


आज विशेष गर्दी नव्हती..
"आज आपण पण वर्तमान पात्र वाचून पाहुया... "
"अरे, याने चांगला मोठा मासा पकडलाय की... " बाता मुखपृष्ठावरच्या चित्रा कड़े बघून म्हटला..
लाम्बडा मासा हातात धरून, तो एक जपानी माणूस हसंत होता..
"गुड!" - बाता...

दुसरं पान बघितलं, "अजुन एक फोटो..."
"आयला... हे काय नाटक? सध्या काय फिशिंग सीजन आहे का काय?? "
बघितलं तर २० पाने भरून फ़क्त माशांची माहीती!!!
पेपरचं नाव होतं:- "त्सुरी-तोमो" का असं काही तरी... (त्सुरी :- मासे पकडने, आणि तोमो:- मित्र...)

हे बघून आता मात्र आम्हीच म्हटलं, "मासाका, मासाच का??"






हॉटेलचं नाव:- "कोहिकान" (कोही :- कॉफी, कान :- हॉटेल)