शनिवार, २१ फेब्रुवारी, २००९

पुरेतोरे

कालच एका ट्रेनिंगबद्दलची मेल आली. (~चं मेल आलं?)
त्यात टिपिकल जपानी पद्धतीप्रमाणे, आधी "काय काय करायचं नाही" याबद्दल मोठी यादी होती..
म्हंजे अगदी लाल फॉण्ट मधे... बोल्ड आणि अन्डर्लाइन करून... (ब्लॉगर मधे अन्डर्लाइन नाही आहेरे!
नवा शोध!)

मग आलं:- आपण हे शिकाल...

आणि नंतर काय तर होतं:- "पुरे तोरे"
मला बर्यापैकी जपानी कळतं... माझं जावूद्या..
त्या डिक्शनरीलाही वाचता येवू नये? अर्थ कळु नये?

जरा नीट विचार केला,
आणि नंतर समजलं:-
"प्री ट्रेनिंग" ला जपानी मधे "पुरेतोरे" म्हणतात..

पुरे तोरे हा "पुरे- तोरे-निंगु" चा शोर्ट फॉर्म!

अशी ही जपानची "काताकाना" भाषा!
जपानी सोडून बाकी भाषेतले शब्द बोलण्यासाठी तयार केली गेली.
आता प्रश्न असा येतो, की हा "काताकाना" शब्द म्हंजे जपानी नाही, हे समजलं..... पण म्हणुन ते इंग्लिश असेलच असं नाही..

"आरू बाइतो" घ्या.

"पॉकेट-मनी" साठीचा हा शब्द. मुळचा "जर्मन!" :- "arbeit"
आता हे आम्हाला कुठून कळणार ???
जाउदे...

चला.. "पुरे" झालं.. निघाला राग...

४ टिप्पण्या:

Yawning Dog म्हणाले...

Changla shabda ahe pure-tore :)
In general "Pre" la pure mhantat ka?

Maithili म्हणाले...

japani bhasha pharach vichitra aahe kaho?? puretore kay? utsukushi kay? baap re....

Suraj म्हणाले...

mast post mayur rao !!

ani blogger var underline karta yeta
ms word madhe lihun copy paste karaycha automatic disata mag.

suraj.

ऋयाम म्हणाले...

धन्यवाद मित्र-मैत्रिणिन्नो..

Yawning Dog >
Preसाठी 前(झेन) अशी कान्जी आहे.
पण यु एस कल्चर रे...

जमत नसल, तरी उन्टाच्या बुडख्याचा मुका घ्यायला जायचे. मग काय होणार?

आयला. देश त्यान्चा. भाषा त्यान्ची. यु एस पण यु एस वाल्यान्चे. मग इथे उन्टाच्या बुडख्याचा मुका कोण घेतय नक्की? जावुदे.

मैथीली>
"अहो"? मी एवढा मोठा नाही आहे अहो.
"अरे दादा" वगैरे चालेल. (एल. ओ. एल. )

Suraj>
आता पुढची पोस्ट फ़ुल्ल-फ़ुल्ल अन्डर्लाइन मित्रा!